संचालक (प्रकल्प) (Functional Director)

एस. के. गुप्ता

संचालक (प्रकल्प)

Mrs. Ajay Kumar Bhatt, Director

श्री. एस. के. गुप्ता यांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी घेतली असून अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल त्यांना विद्यापीठ पदक प्रदान करण्यात आले होते. त्यांनी स्ट्रक्चरल डायनामिक्स मध्ये भारतीय प्रौद्योगिक संस्था रूरकी मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

श्री. गुप्ता हे भूतपूर्व आयआरएसइ अधिकारी असून त्यांच्याकडे २७ वर्षाचा अनुभव आहे व त्यापैकी १७ वर्षे नवी दिल्लीत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ पदांवर त्यांनी काम केले आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये रुजू होणाऱ्या पहिल्या काही अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. भूमिगत तसेच उन्नत अत्याधुनिक मेट्रो रेल्वे जाळ्याचे नियोजन, करार व अंमलबजावणीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय मेट्रो सल्लागार प्रकल्पावर तज्ञ म्हणून काम केले आहे. श्री. गुप्ता यांनी भारता प्रमाणेच परदेशातही काम केले आहे.

दिल्ली मेट्रोसाठी काही उल्लेखनीय आणि ठसा उमटवणारी कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन तसेच रेल्वे विभागा कडून विविध प्रमाणपत्रे व पदके बहाल करण्यात आली आहेत.

Top