आपल्या मेट्रोला जाणून घ्या (Know Your Metro)

असे कोणीतरी अगदी योग्य सांगितले आहे

“जितके जास्त बदल घडून येतात, तितक्याच गोष्टी तशाच राहतात”

logo-stn

कुलाबा-वांद्रे-सिप्झ

लाखो मुंबईकरांना आपल्या पोटात घेऊन साधारणपणे २,१५० रेल्वे गाड्या शहरामधून धावत असतात. जिथे मुंगी शिरायला सुद्धा जागा नसते अशा रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. मुंबईसाठी आता रेल्वेशी समांतर अशी मेट्रो रेल्वेच्या रूपाने दुसरी 'लाईफलाईन' आजच्या क्षणी क्रमप्राप्त ठरत आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वाहतुकीचे चित्र बदलू शकतो. ३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वे मधील गर्दी कमी करू शकतो व त्याच प्रमाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवू शकतो. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे करण्यात येत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या समान भागीदारीमध्ये एक संयुक्त प्रकल्प म्हणून हे कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे.

मुंबई मध्ये लोकांच्या दारापर्यंत मेट्रो रेल्वे पोहोचवून आता अपुऱ्या भासणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेला पूरक ठरणारी सार्वत्रिक जलद वाहतूक प्रणाली बनण्याचा मेट्रो रेल्वेचा प्रयत्न आहे. मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणे शक्य होईल त्याच प्रमाणे प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध होतील. संपूर्णपणे भुयारी असणाऱ्या मेट्रो मार्गावर २७ स्थानके असतील. हा मार्ग मुंबईतील ६ महत्वपूर्ण व्यावसायिक केंद्रांशी, ३0 शैक्षणिक संस्था, ३0 मनोरंजनाची ठिकाणे आणि तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ इत्यादींशी जोडणी उपलब्ध करून देईल. पाच स्थानके उपनगरीय रेल्वेशी अदलाबदल करण्यासाठी असतील ज्यामध्ये एक मोनोरेलसाठी व एक 'वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर' मेट्रो-१ साठी असेल.

एकविसाव्या शतकातील एक अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्प म्हणून मुंबई मेट्रो-३ मार्गाकडे पहिले जाते. या भुयारी प्रकल्पाची बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या इमारतींचे संरक्षण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. प्रवासी मेट्रो ट्रॅकवर जाऊ नयेत म्हणून विशेष सूचना देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो स्थानकांवर स्वयंचलित प्रवासभाडे यंत्र बसविण्यात येणार आहे. यामुळे जमा होणारा निधी मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवणे शक्य होणार आहे.

कनेक्टिव्हिटी आणि कमी मूल्य / किंमत असणारी सोयी आल्यापासून आव्हाने अनेक आहेत. मुंबईतील प्रवास हा आरामदायी, सुरक्षित व आनंददायी बनवून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवीन युग सुरु व्हावे असा मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचा उद्देश आहे.

हा संपूर्ण प्रकल्प मुंबई शहरासाठी पर्यावरण पूरक प्रकल्प असेल.
Top