हरित धोरण (MMRC Green Policy)

मुंबईमध्ये पर्यावरण पूरक, आरामदायी आणि सर्वात कमी उर्जा वापरणारी वाहतूक प्रणाली उपलब्ध करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कटिबद्ध आहे.

       

पर्यावरण धोरण

पर्यावरण रक्षणाचे महत्व मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ठावूक आहे. त्यानुसार पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व धोरणे आणि उपायांचा अवलंब संस्थेतर्फे करण्यात येईल.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या साठी प्रयत्नशील असेल:

 • मार्गिकेतील सध्याच्या हरित पट्ट्याला पूरक पट्टा तयार करणे
 • संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शहरात पर्यावरण पूरक वाहतूक निर्माण करणे व उत्सर्जन आणि कचरा कमी करणे
 • भागधारकांमध्ये पर्यावरणीय उद्दिष्टांच्या बाबत जागरूकता निर्माण करणे व प्रशिक्षण देणे तसेच पर्यावरण रक्षण प्रक्रिया, प्रकल्प अंमलबजावणी मध्ये व नंतरच्या टप्प्यांमध्ये समाविष्ट करणे
 • पर्यावरणीय अधिनियमांचे, नियमनाचे व आपल्याला मान्य असलेल्या इतर पर्यावरणीय उपक्रमांचे पालन करणे
 • आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पर्यावरणीय उपक्रमांना प्रोत्साहित करून एक सक्षम आणि पर्यावरणासंदर्भात जागरूक संस्कृती तयार करणे
 • आवर्ती लाभांकरिता ऑपरेशन कार्याकालामध्ये उर्जाकार्यक्षम पद्धतीचा जास्तीज जास्त वापर करणे
 • कंत्राटदार व उपकंत्राटदार सदर धोरणाचे पालन करतील याची काळजी घेणे

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आपली पर्यावरणीय कामगिरी सतत उंचावत राहील व शाश्वत विकास घडविण्यासाठीची कटिबद्धता दर्शविणाऱ्या पद्धतीने आपले उपक्रम सुरु ठेवील.

Green Flower
       

उर्जा व्यवस्थापन धोरण

पर्यावरण रक्षण ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असल्याची जाणीव एमएमआरसी ला आहे. त्यामुळेच कायदयाने बंधनकारक असले किंवा नसले तरीही पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक ती सर्व काळजी, एमएमआरसी आपली प्रणाली राबवताना घेईल.

त्यानुसार ह्या उपक्रमांचा पाठपुरावा म्हणून संस्था तिच्या प्रकल्पामध्ये उर्जेचा अनुकूल वापर करण्यासाठी खालील प्रमाणे प्रयत्न करील:

 • जगातील सर्वोत्तम मेट्रो सेवांच्या बरोबरीने मुंबई मेट्रो सेवेचे मापदंड आखून घेईल
 • आरेखनापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वाधिक फायदे मिळविण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील
 • आवर्ती लाभाकरिता ऑपरेशन स्थिती दरम्यान ऊर्जा कार्यक्षम पद्धतीना प्रोत्साहन देणे
 • योग्य ते नियोजन करून उर्जेचा वापर कमी करण्याकरिता खालीलप्रमाणे प्रयत्न करणे:
  • अनुकूल लाभांसाठी आरेखन स्थिती पासूनच उर्जाक्षम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल
  • एल ई डी सारखी उर्जाक्षम स्मार्ट प्रकाश योजना, अनुकूल वातानुकूलन पद्धती, फलाटांसाठी संरक्षक दरवाजे, स्मार्ट फलक ऑक्युपन्सी सेंसर इत्यादीचा वापर करून पर्यावरण पूरक मेट्रो स्थानके आरेखित करण्यात येतील
  • इमारती मधील उर्जा वापर कमी करण्यासाठी स्थानकांचे अनुकूल आरेखन करण्यात येतील
  • प्रवाशांच्या गर्दीच्या प्रमाणाशी मेळ खाणारे मंद प्रकाश तंत्रज्ञान वापरून अनावश्यक दिवे बंद / मंद ठेवण्यात येतील
  • स्थानक / आगाराच्या प्रकाश योजनेला पूरक म्हणून नैसर्गिक उजेडाचा वापर करण्यात येईल
  • उर्जाक्षम इंजिने व रेल्वेचे डबे तसेच उर्जेची पुननिर्मिती करणाऱ्या ब्रेकिंग यंत्रणेचा वापर करण्यात येईल
  • स्थानकांवर उद्वाहक / सरकते जिने यांची तरतूद करण्यात येईल
  • स्थानक / आगारामध्ये सौर उर्जा, जल संवर्धन व स्मार्ट प्रकाश योजना यांना प्रोत्साहन देण्यात येईल
  • प्रवाशांच्या गरजेनुसार गाड्यांचे नियोजन करण्यात येईल
  • आवश्यकतेनुसार गाड्यांचा स्थानकांवर थांबण्याचा कालावधी कमी करण्यात येईल व कमी गर्दीच्या वेळेस उर्जेची बचत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल
  • नियमित परीक्षण करून परिचालनामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील
  • प्रवाश्यांच्या संख्येनुसार डब्याच्या आतील वातानुकुलन कमी-जास्त करण्यात येईल.
  • कर्मचाऱ्यांमध्ये उर्जा बचतीबाबत सतत जागरूकता निर्माण करण्यात येईल
  • उर्जेच्या अनुकूल वापरासाठी दीर्घ मुदतीची उपाययोजना करून इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यात येईल
  • सौर उर्जेच्या मदतीने नॉन ट्रॅक्शन / कार डेपोसाठी उर्जा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल

पर्यावरण रक्षण व उर्जा संवर्धन ह्यासाठीच्या आपल्या उद्दिष्टांशी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कटिबद्ध राहील

Brown Flower
Top