मुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये (Quick Facts)

अ. क्र.महत्वाची वैशिष्ट्ये

प्रकल्पाची लांबी ३३.५ कि.मी. असून ६ व्यावसायिक केंद्रे, ५ उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ व रेल्वेने न जोडलेले परिसर जोडले जातील

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गिकेवर एकूण २७ स्थानके (२६ भूमिगत व १ जमिनीवर) आहेत

या प्रकल्पामुळे जोडली जाणारी ६ व्यावसायिक केंद्रे खालीलप्रमाणे:

 • कफ परेड
 • कुलाबा
 • वरळी
 • वांद्रे कुर्ला संकुल
 • एमआयडीसी
 • सिप्झ

प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. २३,१३६ कोटी

प्रकल्पासाठी निधी : प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने अल्प व्याजदराने रु. १३,३२५ कोटी रुपये कर्ज दिले आहे. उर्वरित निधी भारत सरकार, महाराष्ट्र शासन व इतरांनी दिला आहे

अंतर्गत आर्थिक परताव्याचा दर (EIRR) : १७.८९ %

अंतर्गत वित्तीय परताव्याचा दर (FIRR): ३.२ %

प्रकल्पामध्ये बोगदे व भूमिगत स्थानकांचे बांधकाम अंतर्भूत आहे. हे अतिशय आव्हानात्मक काम आहे व बोगदा तयार करण्यासाठी बोगदा खोदण्याची यंत्रे व छेद व आच्छादन पद्धतीने किंवा एनएटीएम किंवा ह्या दोहोंच्या एकत्रीकरणाने करण्यात येईल

मुंबई मेट्रो -३ मार्ग शून्य कार्बन उत्सर्जन करणारी संपूर्णपणे विद्युत प्रणालीवर चालणारी व्यवस्था असेल

१०

२५ किलो वॅट एसी कर्षण पुनर्निर्मित ब्रेकिंग प्रणाली खालील कारणांसाठी वापरली जाईल:

 • प्रतिवर्षी रु. ५० कोटी इतकी उर्जेची बचत
 • ८ कोटी किलो वॅट इतकी वीज निर्माण करून ती इतर स्थानकांवर वापरता येईल
११

२५०० प्रवासी वाहून नेण्याची मेट्रोची क्षमता

१२

मेट्रोचा आरेखित वेग प्रती तास ९० कि.मी. असेल

१३

मेट्रोचा वेग सर्व थांब्यांसाहित प्रती तास सरासरी ३५ कि.मी. असेल

१४

मुंबई मेट्रो-३ ची अंदाजित प्रवासी संख्या :

प्रवासी संख्या (२०२०)प्रवासी संख्या (२०३०)
१३.०० लाख१७.०० लाख
१५

आवर्तता

आवर्तताकुलाबा-वांद्रेवांद्रे-सिप्झडब्याची संख्या
२०२०३.५ मिनिटे७ मिनिटे२१०
२०३१२.५ मिनटे५ मिनिटे३३०
१६

मुंबई मेट्रो-३ साठी प्रतितास-प्रतीदिशा आरेखन :

मार्ग२०२१२०३१
कुलाबा–वांद्रे–सिप्झ३९,०००४२,०००
१७

सर्व स्थानकांवर अत्याधुनिक उद्वाहने आणि सरकते जिने उपलब्ध करण्यात येतील

१८

कुठल्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी फलाटांना सरंक्षक दरवाजे बसविण्यात येतील

१९

स्वयंचलित भाडे संग्रहण प्रणाली व स्मार्ट कार्ड मुळे शून्य महसुली तोट्याची खात्री

२०

उर्जा संवर्धनासाठी स्मार्ट प्रकाश योजना व वातानुकूलन यांची सोय केली जाईल

२१

मुंबई मेट्रो-३ ची सुलभता व सोयी:

 • आगगाड्यांची १००% नियमित आवर्तता
 • प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फलाटांना सरंक्षक दरवाजे
 • महिलांची सुरक्षा व सुरक्षितता
 • टोकन / स्मार्ट कार्ड यासाठी रुंद मार्गिका व स्वयंचलित तिकीट यंत्रे
 • संपूर्णपणे वातानुकुलीत मेट्रो व स्थानक
 • अद्यावत विस्तीर्ण मार्गक्रमण / जागा
 • प्रथमोपचार मदत केंद्रे
 • अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी चाकांची खुर्ची
 • मेट्रोच्या परीचालनाचे केंद्रीय नियंत्रण
 • २४ x७ सीसीटीव्ही टेहळणी
 • आपातकालीन संकट मार्ग
२२

रोलिंग स्टॉक:

 • आधुनिक यंत्रणा डबे व इंजिने
 • स्वयंचलित मेट्रोचे परिचालन
 • वातानुकुलीत व बंद दरवाज्यांची मेट्रो
 • २५ केव्ही ओएचई द्वारे उर्जा, ३,२०० मि.मी. रुंद, ३ फेज प्रचालन प्रणाली
Top