अस्वीकृती (Disclaimer)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली माहिती, ही सामान्य माहिती देण्यासाठी म्हणूनच देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील मजकूर हा कोणताही सल्ला किंवा शिफारस नसून ते मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर बंधनकारक नाहीत. कोणतीही माहिती, किंवा साहित्याचा उपयोग कोणत्याही बेकायदेशीर, फसवणूक, अनैतिक, अपवित्र, व सार्वजनिक हिताच्या विरोधी कामासाठी करता कामा नये. डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर टाकलेल्या प्रत्येक मजकुराची खातरजमा करण्यात येत असली, तरीही असे डाऊनलोडिंग हे आपण आपल्या जोखीमीवर व जबाबदारीवर करीत आहात. ह्या माहितीचा दुरुपयोग करून कोणतेही नुकसान किंवा क्षति पोहोचल्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही. तसेच संकेतस्थळावर दिलेला तपशील वेळोवेळी अद्यायावत करीत असल्यामुळे सतत बदलू शकतो. त्यास्तव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ह्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या मजकुराच्या पूर्णता, अचूकता किंवा उपयुक्ततेबद्दल कोणतेही कायदेशीर उत्तरदायित्व स्वीकारत नाही. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीतील अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन जबाबदार नाही.

संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती किंवा मजकूर हा बदलण्याच्या किंवा दुरुस्ती होण्याच्या अधीन आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संकेतस्थळावरील मजकुरात बदल किंवा दुरुस्ती करण्याचे अधिकार आम्ही राखून ठेवीत आहोत. कोणतीही कृती करण्यापूर्वी माहितीबद्दल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून खातरजमा करून घेण्याची आपणास विनंती आहे. अन्यथा नमूद असल्याशिवाय आपण फक्त वैयक्तिक व गैर व्यावसायिक कामासाठी माहिती डाऊनलोड करु शकता.

संकेतस्थळावरील काही जोडण्या आपणास कोण्या तृतीय पक्षाने ठेवलेल्या व मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कोणतेही नियंत्रण नसलेल्या संकेतस्थळांवर घेऊन जातात. त्या सर्व्हर मध्ये असलेल्या कोणत्याही तपशीलाबद्दल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्वीकारणार नाही.

हे संकेतस्थळ व्हायरस किंवा तत्सम तांत्रिक उपद्रव देणाऱ्या घटकांपासून मुक्त असल्याचा कोणताही दावा एम.एम.आर.सी. करीत नाही. तसेच या संकेतस्थळावरील माहितीत त्रुटी अथवा कालबाह्य तपशील नसेलच, याची हमीही एम.एम.आर.सी. देत नाही.

ह्या संकेतस्थळावर असलेल्या तपशिलाचे स्वामित्वहक्क हे फक्त आणि फक्त मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडेच अनन्य स्वरूपाने आहेत. ह्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर ह्या संकेतस्थळावरील मजकूर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कुठेही पुनर्प्रकाशित किंवा प्रसारित करण्याचा किंवा साठवून ठेवण्याचा परवाना प्राप्त होत नाही.

Top