प्रकल्पासाठी निधी (Project Funding)

मुंबई मेट्रो -३ ह्या प्रकल्पासाठी एकूण रु. २३,१३६ कोटी रुपयांची गुंतवणूक अंदाजित आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था रु. १३,२३५ कोटी रुपयांचे कर्ज देणार असून ते एकूण प्रकल्प खर्चाच्या ५६% आहे. अन्य निधी भारत सरकार, महाराष्ट्र शासन / मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या कडून भांडवल स्वरूपात व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून कर्जाच्या स्वरुपात खालील तपशिलानुसार उपलब्ध होईल.

स्त्रोत रुपये(कोटी) टक्केवारी
केंद्र साह्य २,४०३ १०.४
राज्य साह्य २,४०३ १०.४
केंद्र शासनाकडून उप कर्ज १,०२५ ४.४
राज्य शासनाकडून उप कर्ज १,६१५ ७.०
मिळकत विकसन + प्रभार शुल्क १,००० ४.३
भागधारकांचे साहाय्य (एमआयएएल) ७७७ ३.४
ASIDE निधी / मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अनुदान ६७९ २.९
जायका (JICA) कर्ज १३,२३५ ५७.२
एकूण प्रकल्प खर्च २३,१३६ १००
  • केंद्र साह्य
  • राज्य साह्य
  • केंद्र शासनाकडून उप कर्ज
  • राज्य शासनाकडून उप कर्ज
  • मिळकत विकसन + प्रभार शुल्क
  • भागधारकांचे साहाय्य (एमआयएएल)
  • ASIDE निधी / मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण अनुदान
  • जायका (JICA) कर्ज
our funding graph
Top