आमचे तंत्रज्ञान (Technology)

अ. क्र.प्रवर्गघटकवर्णन
बोगदे
 • बोगदे खोदाई यंत्रे (TBM)
 • बोगदा वायुवीजन प्रणाली (TVS) - सामान्य परीचालानाच्या वेळेस तापमान कायम ठेवण्यासाठी व आणीबाणीच्या वेळेस धूर बाहेर जाण्यासाठी याचा वापर केला जातो
 • ड्रिलिंगसाठी पर्याय म्हणून ही अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येते. गोल आडवा छेद घेताना छेदन व विस्फोटन पद्धतीला पर्याय म्हणून वापरले जाते
 • छेद व आच्छादन (C&C)
 • जमिनीस छेद देऊन पुन्हा आच्छादित केले जाते अशी बांधकामाची पद्धत
 • नवीन ऑस्ट्रीयन बोगदे खोदाई पद्धत (NATM)
 • आधुनिक बोगदा बांधकाम पद्धत – यामध्ये खडक किंवा माती गोलाकार पद्धतीने खणून बोगदा तयार केला जातो
स्थानके
 • स्थापत्य बांधकाम
 • छेद व आच्छादन पद्धत
  किंवा
 • NATM पद्धती द्वारे
  किंवा
 • दोन्ही पद्धती मिळून
 • स्थानकाची वैशिष्ट्ये
 • ग्रेनाईट, काच व स्टेनलेस स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर करून स्थानकास चकचकीत करण्यात येते
 • स्थानकातील प्रकाश योजना
 • स्थानकांसाठी स्मार्ट प्रकाश योजनेचे नियोजन केले आहे
 • वायुवीजन व वातानुकूलन प्रणाली (VAC)
 • धूर व्यवस्थापन प्रणाली व बोगदा वायुवीजन प्रणाली सहित स्थानकामध्ये प्रगत वातानुकूलन प्रणाली
 • स्वयंचलित भाडे संग्रहण प्रणाली (AFC)
 • सक्षम परिचालन / जलद भाडे शुल्क
 • महसुली नुकसानीची शक्यता शून्य
 • जलद निर्वातन
 • फलाटांसाठी सरंक्षक दरवाजे
 • मेट्रो स्थानकांवर कुठलाही अपघात, आत्महत्येचा प्रयत्न टाळण्यासाठी सार्वजनिक सुरक्षिततेकरिता वापरायचे तंत्रज्ञान
3कर्षण प्रणाली
 • वायुवीजन व वातानुकूलन प्रणाली
 • धूर व्यवस्थापन व बोगदा वायुवीजन प्रणाली सोबत स्थानकांवर प्रगत वातानुकूलन प्रणाली
डबे व इंजिने
 • मेट्रो गाडी
 • वजनाने हलकी व स्वस्त
 • विना आधार / हलक्या वजनाच्या
 • रुंदी / अक्सालचे वजन
 • ३.२ मीटर / १७ टन
 • ब्रेकिंग प्रणाली
 • वातशक्तीचालीत सेवा ब्रेक
 • दगा न देणारा वायुशक्तीचालीत आपत्कालीन ब्रेक
 • स्प्रिंग चालित पार्किंग ब्रेक
 • पुनर्निर्मिती ब्रेकिंग व इपी ब्रेकिंगशी सांगड
 • प्रवाशांसाठी दरवाजे
 • चालकाच्या कक्षातून रिमोटद्वारे परीचालीत होणारे दरवाजे
 • वातानुकूलन
 • प्रत्येक डब्यात २ वातानुकूलन यंत्रे
 • बसण्याची व्यवस्था
 • अधिकाधिक प्रवासी बसू किंवा उभे राहू शकतील अशी व्यवस्था
संकेत व संपर्क
 • मेट्रो नियंत्रण
 • मेट्रोच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित निरीक्षण
 • संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास ब्रेक आपोआप लागणार
 • मेट्रोचे सतत निरीक्षण
 • मेट्रोची देखरेख
 • मेट्रोवर दूरस्थ नियंत्रण व सनियंत्रण
 • मार्गाची स्थिती, बिंदू, संकेत, वाहनाचे परिचालन व कर्षण उर्जा नियंत्रण ह्यावर सनियंत्रण ठेवण्यासाठी परिचालन नियंत्रण केंद्र
 • दूरसंचार वैशिष्ट्ये
 • वाहतुकीचे व्यवस्थापन
 • भ्रमण रेडियो संपर्क
 • एल ई डी / एल सी डी आधारित सूचना फलक व प्रवासी उद्घोषणा प्रणाली
 • केंद्रीकृत घड्याळ प्रणाली
 • प्रवासी माहिती फलक
 • सीसीटीव्ही टेहळणी प्रणाली
Top